सुकन्या समृद्धी योजना 2025 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. खाते उघडण्याची प्रक्रिया, फायदे, व्याजदर, कर सवलती, आणि 21 वर्षांनंतर मिळणारी परिपक्व रक्कम याबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
समृद्धी योजना काय आहे?
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana – SSY) ही भारत सरकारची बचत योजना असून ती २२ जानेवारी २०१५ रोजी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता, शिक्षण आणि विवाहासाठी निधी उभारणे.
मुख्य वैशिष्ट्ये–
1.सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता:-.
- खाते उघडताना मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असावे.
- .एका मुलीसाठी एक खाते.
- एका कुटुंबात जास्तीत जास्त २ खाती (ट्विन्स/ट्रिप्लेट्स असल्यास.
2.गुंतवणूक मर्यादा:-
- किमान वार्षिक जमा: ₹२५०
- कमाल वार्षिक जमा: ₹१,५०,०००
- खाते उघडल्यापासून १५ वर्षे योगदान करता येते.
3.व्याजदर:-
- १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या तिमाहीत ८.२% वार्षिक कंपाउंडिंग व्याज उपलब्ध आहे.
- व्याजदर सरकार वेळोवेळी बदलते.
4.खाते कुठे उघडावे?
- मान्यताप्राप्त बँका आणि पोस्ट ऑफिस:
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- पंजाब नॅशनल बँक (PNB)
- बँक ऑफ बडोदा (BOB)
- कॅनरा बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- HDFC, ICICI, Axis Bank इत्यादी.
5.आवश्यक कागदपत्रे:-
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
- पालक/संरक्षकाचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
- पत्ता पुरावा.
- मुलीचा पासपोर्ट साईज फोटो.
- प्रारंभिक जमा रक्कम किमान ₹२५०.
सुकन्या समृद्धी योजना रिटर्न कॅल्क्युलेशन-
खालील तक्त्यात मासिक गुंतवणुकीनुसार मिळणारी अंदाजे रक्कम दर्शवली आहे.
मासिक जमा (₹) एकूण गुंतवणूक (15 वर्षांत) 21 वर्षांनी मिळणारी रक्कम
- 1000 1,80,000 ~3.8 – 4 लाख
- 2000 3,60,000 ~7.6 लाख
- 5000 9,00,000 ~19 – 20 लाख
ही रक्कम ८.२% व्याजदर गृहित धरून काढलेली आहे. सरकार दर तिमाहीत व्याजदर बदलू शकते.
कर लाभ-
Section 80C अंतर्गत दरवर्षी ₹१.५ लाख पर्यंत कर सूट मिळते.
जमा केलेले व्याज आणि अंतिम परिपक्व रक्कम पूर्णपणे करमुक्त (EEE) आहे.
रिटर्न कॅल्क्युलेशन (उदाहरण)-
सध्याचा व्याजदर: 8.2% प्रति वर्ष (वार्षिक कंपाउंडिंग)
मासिक जमा (₹) एकूण गुंतवणूक (15 वर्षांत) 21 वर्षांनी मिळणारी रक्कम (अंदाजे)
- 250 45,000 ~95,000 – 1 लाख
- 500 90,000 ~1.9 लाख
- 1,000 1,80,000 ~3.8 – 4 लाख
- 2,000 3,60,000 ~7.6 – 8 लाख
- 5,000 9,00,000 ~1 – 20 लाख
ही रक्कम 8.2% व्याजदर कायम राहील या गृहितकावर आधारित आहे. दर तिमाहीत सरकार व्याजदर बदलू शकते.
खाते उघडण्याची पद्धत-
- जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत SSY खाते फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- पहिली किमान रक्कम (₹250 किंवा जास्त) जमा करा.
- खाते पासबुक मिळेल.
- पुढील वर्षांमध्ये तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन रक्कम जमा करू शकता.
सुकन्या योजनेच्या सर्वसाधारण अटी –
- सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी
- मुलीला दहावी उत्तीर्ण करणे व 18 वर्षाच्या आत विवाह न करणे बंधनकारक असेल.
- एका कुटुंबातील दोनच मुलांना लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली अपवाद असतील
- अनाथ मुलींना दत्तक घेतल्यास लाभ मिळेल.
- लाभार्थी कुटुंबाला दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असेल.
निष्कर्ष:-
सुकन्या समृद्धी योजना 2025 ही मुलींच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता, उच्च शिक्षण आणि विवाहासाठी निधी उभारण्यासाठी एक उत्तम सरकारी योजना आहे. सुरक्षित व्याजदर, करमुक्त परतावा आणि लवचिक गुंतवणुकीच्या पर्यायांसाठी आजच नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करा.