Site icon Taaza Khabar 18

संजय गांधी निराधार योजना 2025: आता मिळणार ₹2500 प्रति महिना.

IMG_20250720_114349

संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाटप : संपूर्ण माहिती (2025):

महाराष्ट्र सरकारकडून निराधार नागरिकांसाठी ₹2500 प्रती महिना अनुदान. पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

महाराष्ट्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत गरजू, अपंग, निराधारगरीब नागरिकांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. अलीकडेच या योजनेत दरमहा मिळणाऱ्या रकमेत वाढ करून ₹2500 प्रतिमाह वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लेखात आपण योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत – पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, व वाढीव रक्कम मिळवण्याचा मार्ग.

 

संजय गांधी निराधार योजना म्हणजे काय?

संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक सामाजिक योजना आहे, जी गरजू, निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या महिला, तसेच कर्करोगग्रस्त, एड्सग्रस्तगंभीर आजार असणाऱ्यांना मासिक आर्थिक सहाय्य देते.

 

2500 रुपये वाटप – नवीन अपडेट:

पूर्वी या योजनेत दरमहा ₹600 ते ₹900 पर्यंतची मदत दिली जात होती. पण 2025 पासून यामध्ये बदल करून खालीलप्रमाणे वाटप करण्यात येईल:

एकट्या लाभार्थ्याला – ₹1500 ते वाढवून ₹2500 प्रति महिना

दोन लाभार्थी असलेल्या कुटुंबाला – ₹2250 ते वाढवून ₹3750 प्रति महिना

हा निर्णय शासनाने महागाई लक्षात घेऊन घेतला आहे.

 

पात्रता:

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असावी:

1.अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा

2.अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षांदरम्यान असावे

3.40% पेक्षा जास्त अपंगत्व असावा किंवा गंभीर आजार असावा

4.अनाथ, विधवा, परितक्त्या महिला, मानसिकदृष्ट्या अक्षम, दिव्यांग, HIV/AIDS किंवा कर्करोगग्रस्त रुग्ण, गंभीर आजार असलेले नागरिक यांना प्राधान्य

5.अर्जदाराचे वार्षिक कुटुंब उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी असावे

6.अर्जदाराला कोणतीही इतर सरकारी पेन्शन मिळत नसावी.

 

आवश्यक कागदपत्रे:

1. रहिवासी दाखला

2. उत्पन्नाचा दाखला

3. आधार कार्ड

4. मेडिकल सर्टिफिकेट (जर आजार संबंधित असेल तर)

5. अपंगत्वाचा दाखला (जर अपंग असेल तर)

6. विधवा प्रमाणपत्र (जर स्त्री असेल तर)

7. बँक पासबुक

 

अर्ज प्रक्रिया:

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मार्गाने अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज:

1.https://sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा

2. नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा

3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

4. अर्ज सबमिट करा

 

ऑफलाइन अर्ज:

1. जवळच्या तालुका समाज कल्याण कार्यालय किंवा महसूल विभाग येथे जाऊन अर्ज सादर करा

2. अधिकारी अर्ज तपासून लाभ मंजूर

 

अनुदान कधी पास होईल?

सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर व अर्ज मंजूर झाल्यानंतर, लाभार्थ्याच्या बँक खात्यात प्रतिमहिना ₹2500 जमा केले जातील.

 

अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी भेट द्या:

https://sjsa.maharashtra.gov.इन

 

पावसाळी अधिवेशनात निर्णयाची घोषणा:

2025 च्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, संजय गांधी निराधार योजनेतील रकमेबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विधानसभेत अनेक आमदारांनी ही रक्कम महागाईच्या तुलनेत कमी असल्याचे अधोरेखित केले होते.

यावर मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की:

संजय गांधी निराधार योजनेत सुधारणा आवश्यक आहे. गरजूंना अधिक मदत मिळावी यासाठीच ₹2500 प्रतिमहिना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो गरजू, अपंग, विधवा व निराधार व्यक्तींना मोठा दिलासा मिळेल.”

हा निर्णय पावसाळी अधिवेशनात अधिकृतपणे जाहीर झाला असून, लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही वाढ अंमलात आणली जाणार आहे.

 

निष्कर्ष:

संजय गांधी निराधार योजना ही गरजूंसाठी मोठा दिलासा देणारी योजना आहे. 2025 मध्ये वाढवलेले ₹2500 प्रती महिना हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version