बार्टी पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना 2025-
बार्टी पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना साठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे.कागदपत्रे कोणते लागणार आहेत.परीक्षा केव्हा आहे.परीक्षा केंद्र ठिकाण काय असेल,आणि शिष्यवृत्तीचे फायदे कोणते आहेत? या सर्वांची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.
योजना काय आहे? – BARTI पोलीस भरती शिष्यवृत्ती योजना 2025.
BARTI Police Bharti Scholarship Yojana 2025: ही अनुसूचित जातीसाठी (SC) विद्यार्थ्यांसाठी खास योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे,गरीब व वंचित महाराष्ट्रातील गरजू SC विद्यार्थ्यांना पोलीस किंवा सैन्य भरतीपूर्वी शारीरिक, लेखी व मानसिक तयारीसाठी मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे आहे.या योजनेचा मुख्य उद्देश आहे.कारण या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने,खाजगी प्रशिक्षण ते लावू शकत नाहीत.म्हणून बार्टी संस्थेमार्फत SC विद्यार्थ्यांना पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेमार्फत त्यांना विविध लाभ मिळणार आहेत.जसे की ₹72,000 विद्या वेतन हे प्रशिक्षण कालावधी मध्ये मिळणार आहे.या विद्यावेतनासाठी शैक्षणिक पात्रता महत्त्वाची राहणार आहे. किमान 10वी/12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.यासाठी पदवी किंवा पदवीधर उमेदवार ही पात्र आहेत.किमान 18 वर्ष,कमाल 28 वर्ष (SC उमेदवारांसाठी शिथिलता लागू).
1.मोफत प्रशिक्षण:
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी पोलीस, सैन्य, CRPF, SRPF यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी BARTI संस्थेमार्फत संपूर्ण मोफत प्रशिक्षण दिले जाते.कारण या विद्यार्थ्यांना खाजगी प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिकपरिस्थिती बिकट असल्याने ते घेऊ शकत नाहीत.शिक्षणासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून,जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे त्यांचा कल वाढावा म्हणून बार्टी संस्थेमार्फत SC विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच लेखी + शारीरिक चाचणी तयारी.काही प्रशिक्षण केंद्रांवर निवास आणि जेवणाची सुविधाही असते.
2.शिष्यवृत्ती सुविधा:
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पोलीस भरती मोफत
प्रशिक्षणासाठी Barti संस्थेने जे विद्यार्थी 10 वी किंवा 12 उत्तीर्ण आहेत. तसेच पदवी किंवा पदवीधर विद्यार्थ्यांना महिन्याला अंदाजे ₹10,000 पर्यंत शिष्यवृत्ती सुविधा बार्टी संस्थेमार्फत केली जाते.एका उमेदवारास प्रशिक्षण कालावधीसाठी एकूण ₹10,000 – ₹50,000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
3.पात्रता निकष:
बार्टी संस्थेने अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी आहेत, पोलीस भरती विद्यावेतनासाठी महत्त्वाचे पात्रता निकष आहेत. ते खालील प्रमाणे आपण पाहूया.
1.वयाची अट
किमान वय: 18 वर्ष
कमाल वय: 28 वर्ष (SC उमेदवारांसाठी शिथिलता लागू)
2.शैक्षणिक पात्रता
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजनेसाठी अनुसूचित विद्यार्थी यांची शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे.
किमान 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदवीधर उमेदवारही पात्र आहेत.
3.इतर अटी:
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी नियम आणि अटी खूप महत्त्वाच्या ठरतात.
1.उमेदवार SC प्रवर्गातील असावा.
2.महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3.वैद्यकीय आणि शारीरिक पात्रता आवश्यक:
पुरुष: उंची – किमान 165 सेमी, छाती 79-84 सेमी
महिला: उंची – किमान 155 सेमी
4.अर्ज प्रक्रिया:
अनुसूचित जातीतील उमेदवार बार्टी पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतनासाठी खालील प्रकारे ऑनलाइन बार्टी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा Google Form द्वारे अर्ज करु शकतील.
1.अर्ज कसा कराल?
अधिकृतवेबसाइट:https://barti.maharashtra.gov.in
2.Google form Link
https://forms.gle/osGvo5tdehLo3f9p7
5.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत:
बार्टी पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजनेसाठी आणि विद्या वेतनासाठी उमेदवाराकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ते महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
1.जात प्रमाणपत्र-
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी उमेदवाराकडे जात प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे. जात प्रमाणपत्रावर स्वतःचे नाव आणि जातीचा उल्लेख असणे गरजेचे आहे.
2.अधिवास प्रमाणपत्र-
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. उमेदवार ज्या जिल्ह्यात राहतो. त्या जिल्ह्याचा पुरावा म्हणून उमेदवारास रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
3.शैक्षणिक प्रमाणपत्रे-
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक पुरावा अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये दहावी गुण मार्कशीट, बारावी गुण मार्कशीट तसेच पदवी किंवा पदवीधर इत्यादी प्रमाणपत्र उमेदवार सादर करू शकतो.
4.ओळखपत्र-
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याकडे ओळखीचा पुरावा अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामध्ये उमेदवाराकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्र इत्यादी असणे गरजेचे आहे.
प्रवेश परीक्षा (CET) आणि प्रशिक्षण केंद्रे:
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी
अनुसूचित जातीतील उमेदवारास प्रवेश परीक्षा किंवा सामायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरचं या सुविधांचा लाभ मिळणार आहे. प्रवेश परीक्षा (CET) कशी असणार? प्रशिक्षण केंद्रे पाहूया !
1.CET परीक्षा काय आहे?
अनुसूचित जातीतील उमेदवारांची निवड CET (Common Entrance Test) च्या आधारे केली जाते.CET मध्ये General Knowledge, Intelligence Test, Marathi, Reasoning यांसारख्या विषयावर प्रवेश परीक्षा असते.
2.प्रशिक्षण केंद्रे-
बार्टी संस्थेमार्फत ज्या योजना राबविल्या जातात,त्या -त्या योजनेसाठी प्रशिक्षण केंद्रे वेगळे आहेत.पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजनेसाठी प्रशिक्षण केंद्रे खालील प्रमाणे आहेत.
1.पुणे (BARTI, Pune)
2.नागपूर (ARTI, Nagpur)
इतर निवडलेले कोचिंग इन्स्टिट्यूट्स
परीक्षा तारीख आणि वेळापत्रक-
टप्पा अपेक्षित वेळ
–Online अर्ज सुरु जुलै 2025 पासून
–CET परीक्षा सप्टेंबर – ऑक्टोबर 2025
–मेरिट लिस्ट ऑक्टोबर 2025 अखेर
-प्रशिक्षण सुरु नोव्हेंबर 2025 पासून
प्रशिक्षणात काय समाविष्ट आहे?
पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतनासाठी
या योजनेसाठी अनुसूचित जातीतील उमेदवारास प्रशिक्षण कालावधीमध्ये काय समाविष्ट असणार आहे.आपण पाहूया.
1.पोलिस भरतीसाठी शारीरिक प्रशिक्षण.
2.लेखी परीक्षेसाठी अभ्यासक्रम.
3.दरमहा स्टायपेंड.
4.मोफत वसतिगृह व भोजन.
5.अभ्यास साहित्य.
बार्टी संस्थेमार्फत सैन्य व पोलिस भरतीसाठी एकत्रित प्रशिक्षण दिले जाते.
निष्कर्ष:-
BARTI पोलीस भरती शिष्यवृत्ती योजना 2025 ही SC प्रवर्गातील तरुणांसाठी महत्त्वाची खूप महत्त्वाची सुवर्णसंधी आहे. ज्यांना पोलीस किंवा सैन्यात भरती व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण व शिष्यवृत्ती दोन्ही अतिशय उपयुक्त आहेत. आता वेळ वाया न घालवता त्वरित फॉर्म भरून तयारी सुरू करा.