Latur Jilha Parishad Result 2026:-

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. महायुतीकडे अपेक्षित संख्याबळ असले तरी अध्यक्षपदाच्या वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद उघड झाले आहेत.

लातूर जिल्हा परिषदेत संख्याबळाचे गणित

59 जागांच्या लातूर जिल्हा परिषदेत निकाल पुढीलप्रमाणे लागला आहे:

  • काँग्रेस – 23 जागा
  • भाजप – 18 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 12 जागा
  • शिवसेना – 1 जागा
  • शिवसेना UBT गट – 1 जागा
  • राष्ट्रवादी SP गट – 1 जागा
  • मनसे – 1 जागा
  • इतर – 2 जागा

महायुतीचे एकत्रित संख्याबळ 31 इतके होते, जे सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकड्याच्या जवळ आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडून होणे अपेक्षित मानले जात आहे.

महाविकास आघाडीचे संख्याबळ 25 असे आहे.

अध्यक्षपदावरून निर्माण झालेला पेच-

भाजपकडे सर्वाधिक जागा (महायुतीत) असल्याने अध्यक्षपदावर दावा करणे स्वाभाविक आहे. भाजपने अध्यक्षपदावर ठाम भूमिका घेतली आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने 50-50 फॉर्म्युला पुढे ठेवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार

  • अडीच वर्ष अध्यक्ष – भाजप
  • अडीच वर्ष अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांनी प्रदेशाध्यक्षांना माहिती दिली असून अंतिम निर्णय लवकरच होईल.हे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका: 5 वर्षांचा आग्रह-

राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ 50-50 फॉर्म्युलाच नाही तर पूर्ण 5 वर्ष अध्यक्षपदाचा आग्रह देखील धरला असल्याची चर्चा आहे.

मागील नगरपालिका, नगरपंचायत आणि विशेषतः लातूर महापालिकेत महायुतीत झालेल्या मतभेदांचा परिणाम अजूनही जाणवत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपपासून थोडे अंतर ठेवून राजकीय भूमिका घेत असल्याचे दिसते.

अध्यक्षपदाचा चेहरा कोण?

अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असल्याची परिस्थिती असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.महायुतीत भाजपने अध्यक्ष पदासाठी दावा केला आहे.

भाजपकडे काय स्थिती?

भाजपकडे सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या 3 महिला सदस्य आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पर्याय उपलब्ध आहेत.म्हणून भाजपला अध्यक्ष पदाची ओढ लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे काय अडचण?

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या सर्वसाधारण महिला सदस्य नाही.

जर 50-50 फॉर्म्युला ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेस इतर महिला सदस्याला सर्वसाधारण गटातून संधी देणार का?

हा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे.हा फॉर्मुला यशस्वी ठरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्वसाधारण गटातील प्रतिनिधित्वाचा प्रश्न

सर्वसाधारण महिला गटासाठी असलेल्या अध्यक्षपदावर इतर प्रवर्गातील सदस्याला संधी दिल्यास सर्वसाधारण महिला प्रतिनिधीवर अन्याय होणार का? राष्ट्रवादी काँग्रेसकडे सद्या सर्वसाधारण महिला नसली तरी अध्यक्ष पद राष्ट्रवादीला देण्याचा महायुतीत निर्णय झाल्यास पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसाधारण महिला सदस्य उमलब्ध करेल.

हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार विक्रम काळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, आवश्यक असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसाधारण महिला सदस्य उपलब्ध करेल. मात्र हा आत्मविश्वास आहे की दबावतंत्र, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

भाजप किती झुकणार?

राजकीय समीकरणांनुसार भाजपकडे अधिक जागा आहेत. त्यामुळे अध्यक्षपदावर दावा करणे साहजिकच ते योग्य ठरते.

मात्र सत्तास्थापनेसाठी स्थिरता महत्त्वाची असल्याने भाजप काही प्रमाणात तडजोड करणार का? हे पण पाहणे महत्वाचे आहे.

जर भाजपने 50-50 फॉर्म्युला मान्य केला, तर महायुतीत समन्वय वाढेल. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी भूमिका घेऊ शकते.त्यामुळे या फॉर्मुला वर दोन्ही गटातील नेत्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना याची कल्पना दिली आहे.

काँग्रेसची भूमिका काय?

काँग्रेसकडे 23 जागा असून ती सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी तिला इतर पक्षांचा पाठिंबा आवश्यक आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहिले तर, काँग्रेस -23, शिवसेना UBT गट -01, राष्ट्रवादी SP- 01, एकूण -25 त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत नाही.

जर महायुतीत मतभेद वाढले तर काँग्रेसलाही राजकीय संधी मिळू शकते. त्यामुळे पुढील काही दिवस लातूरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

पुढील राजकीय घडामोडी-

  • प्रदेशाध्यक्ष पातळीवर चर्चा
  • अध्यक्षपदावर अंतिम निर्णय
  • उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता
  • 50-50 फॉर्म्युला मंजूर होण्याची शक्यता
  • वरिष्ठ नेत्यांशी चर्चा नंतर लवकरच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यावर तोडगा निघेल.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार अंतिम निर्णय काही दिवसांत जाहीर होऊ शकतो.

निष्कर्ष:-

लातूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच अजून कायम आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 50-50 फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार?

भाजप आपली मोठ्या भावाची भूमिका कायम ठेवणार की राष्ट्रवादीच्या दबावासमोर तडजोड करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

शासनाने तारीख दिल्यानंतर जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड केली जाईल.निवडून आलेल्या उमेदवारांची नावे गॅझेटमध्ये झाली प्रसिद्ध.

लातूरच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *